नगर तालुका | ११ ऑगस्ट | राहुल जाधव
तालुक्यातील देहरे ग्रामपंचायत येथे पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी health बैठक पार पडली. विविध उपाय योजण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गावात फॉगिंग मशीनद्वारे धूर, औषध फवारणीची मोहिम हाती घेण्यात आली. उपसरपंच प्रा. दीपक जाधव यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, गावातील सर्व खाजगी डॉक्टर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, हायस्कूलचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये शाळेतील सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याच्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या आजारांची साथ शहरासह नगर तालुक्यात पसरत आहे.
गावात देखील काही रुग्णांमध्ये ती लक्षणे दिसून आल्याने तातडीची बैठक घेऊन साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. तर प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तणनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी, टीसीएल पावडर टाकण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांना आजाराचा सामना करावा लागू नये, यासाठी ग्रामपंचायत तयारी करणार असल्याचे उपसरपंच प्रा.दीपक जाधव यांनी सांगितले.
आढावा बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य अजित काळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.डोरले, माने, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे, करंडे वस्तीचे मुख्याध्यापक विलास पगारे, नवभारत विद्यालयाचे शिक्षक अंकुश बर्डे, अशोक लष्करे, डॉ.जगदीश निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार साळवे, लिपिक दीपक बर्डे, अंगणवाडी सेविका सुमन कल्हापुरे, मीरा पवार, मंगल काळे, बानो शेख आदी सहभागी होते.
कृपया,बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
उपाययोजना करत आहेत, बैठक घेतली. हेच मुळात कौतुकास पात्र आहे. सरपंच, उपसरपंच यांनी प्रत्येक ऋतू बदलण्यापूर्वी बैठक घेतली पाहिजे.
आपले म्हणणे खरे आहे