अहमदनगर | तुषार सोनवणे
legal येथील विशेष जिल्हा न्यायाधिश एम.एच.शेख यांनी अहिल्याबाई होळकर मार्ग बेकरी हल्ला प्रकरण आरोपी आकाश सुनील पवार व जयेश लक्ष्मीकांत लासगरे या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
बेकरी हल्ला प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांचे जामीन अर्ज ठेवण्यात आले होते त्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने ॲड.संकेत नंदु बारस्कर यांनी सविस्तर लेखी म्हणणे देऊन तोंडी युक्तिवाद केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून फिर्यादीस जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करण्यात आली होती. आरोपींना जामिनावर सुटका केल्यास फिर्यादीस व कुटूंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोपींचे जमीन अर्ज रद्द होवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड.संकेत नंदु बारस्कर यांनी केली होती. यावर आरोपी पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला आरोपींचा सहभाग तसेच फिर्यादीस झालेली मारहाण, अशा सर्व बाबींचा विचार करून दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज ता.२९ रोजी फेटाळून लावला.
जखमी कासीम कासार यांच्या वतीने ॲड.संकेत नंदु बारस्कर यांनी काम पाहिले, त्यांना ॲड.प्रकाश सावंत, ॲड.स्वप्नील खरात, ॲड.आकाश अकोलकर आदींनी सहकार्य केले.