अहमदनगर | तुषार सोनवणे
येथील amc अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाकीर शेख यांनी ठराव मांडून सर्व ठेकेदारांनी एकमताने मंजुरी देत अध्यक्षपदी सचिन लोटके तर उपाध्यक्षपदी शोएब शेख, ओमकार देशमुख, नाजीर शेख यांची निवड करण्यात आली.
यावेळी अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र लोणकर, आनंद पुंड, शाकीर शेख, अनुप शेट, अभिजीत काळे, मोईन खान, नितीन फुलसौंदर, अक्रम शेख, इमरान शेख, नंदू धाडगे, भैय्या पठाण, कुलदीप भिंगारदिवे, प्रसाद चनोडिया, महेश व्यापारी, निकेतन लोटके, महेश लोटके, शहानवाज शेख, मोसिन शेख, झहीर शेख, रोहित, राहुल पडोळे, तारीख शेख, सुमित जायभाय, अक्षय, दीपक कावळे, अमोल नांगरे, शाहरुख शेख, प्रसाद साळी, विकार शेख, जावेद राजे, आकिस सय्यद, अभिजीत चिप्पा आदीसह ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ठेकेदार संघटनेचे नूतन अध्यक्ष लोटके म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेच्या ठेकेदारांना अनेक अडचणी येतात त्यामध्ये ठेकेदारांना वेळेवर बिल अदा होत नाही व बयाना रक्कम मिळणेबाबत सेक्युरिटी डिपॉझिट, लायब्ररी प्रिंट कमी करणे छाननी समिती लवकर करणे अशा विविध अडीअडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील काळात संघटनेच्या मार्फत ठेकेदारांना येणारी अडचण सोडवण्यासाठी अध्यक्ष या नात्याने कटिबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली. तर या निवडीबद्दल अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.