positive thoughts:ऐतिहासिक वारसा जपण्याची युवकांनी केली प्रतिज्ञा; मांजरसुंबा गडाची केली स्वच्छता; सोशल मीडियाचा सकारात्मक वापर - Rayat Samachar

positive thoughts:ऐतिहासिक वारसा जपण्याची युवकांनी केली प्रतिज्ञा; मांजरसुंबा गडाची केली स्वच्छता; सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
60 / 100

नगर तालुका | प्रतिनिधी

positive thoughts आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये हल्लीची तरुण पिढी वहावत चालल्याचे आपण अनेक उदाहरणे पाहतो परंतु याच सोशल मीडियाचा वापर करून खूप काही विधायक कार्य करता येऊ शकते याचे उदाहरण पिंपळगाव माळवी येथील युवकांनी दाखवून दिले आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सात आठ युवक दररोज मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने पिंपळगाव तलाव येथे फिरावयास जात होते. त्यांनी नंतर योगा, प्राणायाम व सामाजिक कामास सुरुवात केली. एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर दररोज नवनवीन उपक्रम पाठविले. या ग्रुपवरील माहिती पाहून ग्रुपमध्ये दररोज संख्या वाढत गेली. एकाच महिन्यात या ग्रुपच्या सदस्यांची संख्या पन्नास झाली. ग्रुपमधील सदस्यांनी पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील टेंभी खंडोबा मंदिर, गोरक्षनाथ मंदिर व मांजरसुंबा गड येथे दर रविवारी भेट देऊन परिसरात प्लॅस्टिक मुक्तीची घोषणा दिली. प्लॅस्टिक पदार्थ गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यापुढे देखील प्रत्येक रविवारी परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देऊन या परिसराचे पर्यावरण व ऐतिहासिक संवर्धन करण्याचा मनोदय ग्रुपमधील सर्व सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती देताना योगशिक्षक संतोष बनकर म्हणाले, आम्ही दररोज योगाबरोबरच एक तरी सामाजिक कार्य करण्याचा उपक्रम राबविणार आहोत. ग्रुपची संख्या वाढवून एक चळवळ व्हावी, असा आमचा मनोदय आहे.

ग्रामपंचायत सदस्य सागर गुंड म्हणाले, समाजमाध्यमाचा योग्य वापर कसा असतो हे या ग्रुपने दाखवून दिले आहे. मोठे सामाजिक कार्य या ग्रुपच्या माध्यमातून व्हावे हीच सर्वांची ईच्छा आहे.

हे हि वाचा : paris olympic 2024:पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याने जगाला केले चकित

Share This Article
1 Comment