नवी दिल्ली | प्रतिनिधी
येथील वैभवशाली नगर Urban बँक २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुवेंद्र गांधी यांस Court नवी दिल्ली न्यायालयाने ५० लाख रूपये ६० दिवसांत भरण्याचे नुसते आदेश दिले आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपीची चालढकल करण्याची प्रवृत्ती, वारंवार वेगवेगळी भूमिका घेणे, कोर्टात नेहमी गैरहजर राहणे, फरार होणे, दंडाची रक्कम न भरणे या बाबींमुळे नाराजी व्यक्त केली आहे.
Crime आरोपीचे म्हणणे होते की, चेकवरील सही माझी आहे परंतु घेतलेली रक्कम प्रविण उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी घेतलेली आहे. माझे दिवंगत पिता स्व. दिलीप गांधी यांनी या व्यवहारात मध्यस्थी केली होती. माझे चेकबुक माझे वडीलांकडे होते त्यांनी ते चेक गॅरंटी म्हणून दिले होते.
न्यायालयाने ही भूमिका अमान्य केली. व्यवहारातील रक्कम सुवेंद्र गांधीच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे. एवढा मोठा व्यवहार कोणी दुसऱ्यासाठी अशा पद्धतीने करणे अशक्य वाटते, असे सांगून नियमानुसार २०% रक्कम भरून घेण्याची तरतूद असताना रक्कमेचे स्वरूप मोठे असल्याने आरोपीला सुरूवातीचा परतफेड हप्ता म्हणून रू ५० लाख रूपये ६० दिवसांत भरण्यचे आदेश दिले. याविषयी पुढील कामकाज ता. १२.८.२०२४ रोजी होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.