कृषी महाविद्यालयात वृक्षारोपणाने ना.राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवस साजरा - Rayat Samachar

कृषी महाविद्यालयात वृक्षारोपणाने ना.राधाकृष्ण विखे यांचा वाढदिवस साजरा

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर (विजय मते) २२.६.२०२४

 विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस कृषी महाविद्यालयात वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. या वेळी परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.

यावेळी प्राचार्य धोंडे म्हणाले, ना.विखे यांच्या विचारांना, कार्याला भूषणावह वाटेल असा पर्यावरण जपण्याचा प्रयत्न आहे. पर्यटनवाढीला पोषक वातावरण तयार करणे मानवाच्या हातात आहे. ते कर्तव्य आपण सर्व मिळून पार पाडू, असे सांगितले.

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी प्रत्येक वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली. ही जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांच्या या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.

Share This Article
Leave a comment