latest news: 1'गॅंग' संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही - देवेन्द्र फडणवीस; गुन्ह्यामध्ये 'कोणीही' असले तरी त्याला 'शिक्षा होणार' फडणवीसांचा 'शब्द' - Rayat Samachar

latest news: 1’गॅंग’ संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही – देवेन्द्र फडणवीस; गुन्ह्यामध्ये ‘कोणीही’ असले तरी त्याला ‘शिक्षा होणार’ फडणवीसांचा ‘शब्द’

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचे 'आश्वासन'

रयत समाचार वृत्तसेवा
उपसंपादक | दिपक शिरसाठ

संतोष देशमुख यांच्या पत्नीला देणार सरकारी नोकरी

मुंबई | ९ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणांचा अहवाल येत्या दोन दिवसांत मिळणार असून तपासाची संपूर्ण माहिती देण्यात येणार असल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशममुख यांनी दिली.

  (latest news) देशमुख कुटुंबियांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीमध्ये देशमुखांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली असून गुन्हेगारांना आम्ही सोडणार नसल्याचे ‘आश्वासन’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी भाजपच्या आमदार नमिता मुदंडा, सुरेश आदी उपस्थित होते.latest news

अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले, आम्हाला न्याय पाहिजे, तो कसा देणार याबद्दल सविस्तर चर्चा झाली असून २६ मे पासून ९ डिसेंबरपर्यंत जेवढे एफआयआर झाले त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यातील इंटरलिंक आम्ही त्यांना सांगितली असून मागील पाच महिन्यांत काय काय झालं होतं, त्याबाबतही आम्ही सविस्तर माहिती दिली.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. कठोर कारवाई होणार असून ‘गॅंग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही’. कुटुंबिय जे म्हणतील, त्या अधिकाऱ्यांना एसआटीमध्ये घेणार आहोत. या प्रकरणी बीडमधील व्यावसायिकांना सुद्धा भेटणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले.latest news

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले. त्यांच्यावर आमचा विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल. तपास यंत्रणांबाबत नेमक काय झाले, कुठपर्यंत तपास आला, तपासाची पुढील दिशा काय हे दोन दिवसांत स्पष्ट होणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत एसआयटीच्या तपासातील बारकावे समोर येणार असून त्यातील खुलासेही समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय देशमुख म्हणाले की, या गुन्ह्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हायला हवा, अशी भूमिका आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली असून त्यांनीही मागणी मान्य केली. या गुन्ह्यामध्ये ‘कोणीही’ असले तरी त्याला शिक्षा होणार असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.latest news

तपासासंबंधी बोलताना देशमुख म्हणाले, जे एफआयआर या संदर्भात नोंदविण्यात आले आहेत, त्याप्रमाणेच आम्ही मुख्यमंत्र्यांना घटनाक्रम सांगितला. जेव्हा घटना घडली तेव्हाचे सर्वांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सर्व तपास करा, अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दोन दिवसात जो तपास झाला आहे त्याचा अहवाल आपल्याला मिळेल.

देशमुख यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळले असल्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासनात सामावून घेण्याचा म्हणजेच सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख यांची मुले लहान असल्याने संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, असे धस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्र्यांनी परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पडलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांबाबतही असाच निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाणार आहे.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment