(Agriculture) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती अर्पण केलेली ग्रामगीता नूतन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देऊन निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी त्यांचे स्वागत केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतातील सर्व संतांच्या विचारांचे एकत्रीकरण ग्रामगीतेत केले. यामध्ये शेतकऱ्यांची उन्नती, शेतकऱ्यांची प्रगती, गोपालन संगोपन, राष्ट्रीय एकात्मता, तरुण बेरोजगारांना हाताला काम मिळाले पाहिजे. या सर्वांचा विचार ग्रामगीतेत केलेला आहे. विशेषत: ही ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती अर्पण केलेली आहे.
(Agriculture) नूतन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावाढीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत. आपल्या जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळी भाग आहे. त्या ठिकाणी जलसंधारणाची चांगली कामे व्हावीत, दुग्ध व्यवसायात आपला जिल्हा अग्रेसर आहे. या व्यवसाय वाढीसाठी त्यांच्या हातून जिल्ह्यात चांगले काम व्हावे. अशा उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा ग्रामगीता देऊन सन्मान केला असल्याचे भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले.