Accident | कानिफनाथ फाट्यावर एसटी-टेम्पोची धडक; जिवीतहानी टळली

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | २४.३ | रयत समाचार

(Accident) शिरूर ते सरदवाडी दरम्यान असलेल्या कानिफनाथ फाटा येथे आज राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस व टेम्पो यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

(Accident) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड डेपोची गेवराई–पुणे मार्गावरील एसटी (क्रमांक MH13 CU 7522) हिने हॉटेल कानिफनाथ समोर टेम्पो (क्रमांक MH14 MH 7589) यास मागून धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

(Accident) अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातग्रस्त एसटीतील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये हलवण्याचे काम सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

 

Share This Article