श्रीरामपूर|२४ डिसेंबर|सलीमखान पठाण
Shirdi News शिर्डी लोकसभा मतदारसंघ व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुका अतिशय शांततेत,निर्भयपणे, व नियोजनबध्द ,कुशलतेने पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी अधिकारी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
प्रास्तविक व स्वागत पाटणी विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकुलोल यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
सचिव सुनील साळवे यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ रेड क्रॉस सोसायटीला मिळालेले अष्टपैलू पदाधिकारी असून किरण सावंत पाटील यांचे नेतृत्वाखाली सर्व टीम जिल्ह्यात कार्य करत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा मोठा फायदा प्रशासनात होतो. कर्तृत्ववान पदाधिकारीमुळे रेड क्रॉसचे काम प्रगतीपथावर चालू आहे. रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांचे कामाची प्रशंसा वरिष्ठांकडून झाली याचा रेड क्रॉस सोसायटीला अभिमान असल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले
सत्काराला उत्तर देताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ म्हणाले प्रांताधिकारी किरण सावंत यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास मिळाल्याने खूप शिकण्यास मिळाले.रेड क्रॉसचे सेवाकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.या पुरस्काराने काम करण्याची दुप्पट प्रेरणा मिळेल.असे सांगत मिलिंद कुमार वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.
अध्यक्षीय मनोगत व सत्काराला उत्तर देताना किरण सावंत म्हणाले रेड क्रॉस चे अविरत सेवाकार्य प्रेरक आदर्श आहे. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही निवडणुका शांततेत नियोजनपूर्वक पार पाडणेसाठी महसूल स्टाफ, निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असतो. रेड क्रॉसचे कामाविषयी किरण सावंत यांनी समाधान व्यक्त करत विविध कार्यक्रमचे वार्षिक नियोजन बनवण्याचे सूचित केले. भविष्यात गरजू नागरिकांपर्यंत विविध सुविधा रेड क्रॉस उपक्रमांद्वारे पोहोचविण्याचे कार्य सदस्यांनी करावे असे आवाहनही सावंत यांनी केले. आमचा केलेला सन्मान हा नवसंजीवनी देणाराच असेल त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. असे किरण सावंत यांनी सांगितले. तर उपस्थितांचे प्रवीणकुमार साळवे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी भरत कुंकुळोल , श्रावण भोसले, सुरेश वाघुले, पोपटराव शेळके, सचिन चंदन, संदीप छाजेड, गणेश थोरात, अरुण कटारे, केशव धायगुडे, बन्सी फेरवानी, विनोद हिंग्निकर, प्रवीण साळवे, श्रीकांत दहिमिवाल, डॉ.स्वप्नील पूर्णाले, बदर शेख, ज्ञानदेव माळी, शिवाजी गोरे, अवधूत कुलकर्णी, साहेबराव रक्टे, मायाताई चाबुकस्वार, पुष्पाताई शिंदे, सुभाष बोधक, मधुकर वेडे, सोमनाथ जगताप आदी आजीव सभासद उपस्थित होते.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.