पद्मश्री पोपट पवार यांची प्रमुख उपस्थिती
अहमदनगर | २३ डिसेंबर | प्रतिनिधी
(Ahilyanagar News) ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘THE DREAM THAT INSPIRES US TO DREAM’ स्वप्न जे प्रेरणा देते या संकल्पनेखाली उत्सवात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे हिवरेबाजारचे पद्मश्री पोपट पवार यांचा सत्कार प्राचार्या सिस्टर नीलिमा रॉड्रिग्ज यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच विद्यालयाच्या मॅनेजर सिस्टर रीता लोबो, प्राथमिक विद्यालयाच्या प्रिन्सिपल सिस्टर रेश्मा, डॉन बॉस्को विद्यालयाचे मराठी व इंग्रजी माध्यमाचे फादर, ऑक्सिलियम कॉन्व्हेंटचे एसएससी टॉपर रितीशा मंत्री व एचएससी टॉपर शर्वरी पवार व त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे गोविंद जयवंत कांडेकर व गॅस्पर बनसोडे यांचेही सेवा रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेत सेवा झाल्यामुळे त्यांचाही कुटुंबासह सत्कार संस्थेच्या व शिक्षकांच्या वतीने मानचिन्ह देवू सत्कार गौरविण्यात आले.
(Ahilyanagar News) यावेळी पद्मश्री पोपट पवार म्हणाले, स्वप्न जे प्रेरणा देते यावर हिवरेबाजार गावचा ग्रामीण विकास, पाणी प्रश्न, पर्यावरणाच्या माध्यमातून झालेला विकास. नामवंत शैक्षणिक संस्थेने व अनेक देशातील मान्यवरांनी गावाला भेटी दिल्या. सामाजिक व शैक्षणिक सलोखा निर्माण कसा केला जातो यावर मोलाचे मार्गदर्शनपर विचार मांडले.
पद्मश्री पोपट पवारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमांमध्ये प्रार्थना नृत्य, स्वागत गीत आणि विद्यार्थ्यांचे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. डॉन बॉस्को, बाबा आमटे, एपीजे अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या भारतासाठी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल नाटिका सादर करण्यात आली.
गोविंद कांडेकर व सविता कांडेकर कुटुंबियांनी संस्थेतील सेवा रौप्य महोत्सवीनिमित्त येथील अनाथ मुलांसाठी रुपये पंचवीस हजाराची देणगी दिली. मुख्याध्यापिका सिस्टर नीलिमा रॉड्रिग्ज, व्यवस्थापिका सिस्टर रीता लोबो, सिस्टर रेश्मा, शिक्षक व शिक्षकेतर, पालक व विद्यार्थी यांच्या परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच ऑक्झिलियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा दिली.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर