डिसेंबरमध्ये वितरण; चपराक प्रकाशनाची निर्मिती
सातारा | ३० नोव्हेंबर | प्रतिनिधी
literature review कराड येथून दिला जाणारा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार वांबोरी, अहमदनगर येथील युवालेखक आशिष अशोक निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ चरित्रपुस्तकाला जाहीर झाला, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली.
literature review पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार स्पर्धेचे पुरस्कार जाहीर झाले. यावेळी अध्यक्ष संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासाहेब निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विविध विभागातील साहित्यकृतींमधून येथील हरहुन्नरी लेखक आशिष निनगुरकर यांच्या चपराक प्रकाशनाची निर्मिती असलेल्या ‘अग्निदिव्य’ या चरित्र पुस्तकाची निवड झाली. या संग्रहास यंदाचा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा या पुस्तकातून मांडण्यात आली. एका आईचं कर्तव्य पार पाडलं. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. रमाबाई कांबळे यांचा जीवनपट वाचून आपल्या जीवनातील असंख्य अडचणी आपल्याला नगण्य वाटतील व स्त्रीचा आदर करणे गरजेचे आहे हे देखील मनोमन पटते. नात्यांची ओळख सांगणारे हे आशयघन पुस्तक काळजाचा ठाव घेणारे आहे. एरवी कुणाच्या लक्षातही न येणाऱ्या सामान्य स्त्रीचे “अग्निदिव्य” आशिष निनगुरकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणले.
या पुस्तकाची दखल स्पंदन संस्थेने घेतली असून ‘चपराक प्रकाशन’ची दर्जेदार निर्मिती असलेल्या या पुस्तकाला हा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
आशिष यांची एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली असून या पुस्तकांनी साहित्यक्षेत्रातील विविध मानाचे साहित्य पुरस्कार पटकावले आहेत. त्यातील ‘अग्निदिव्य’ या पुस्तकाची दखल घेण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप असून आशिष निनगुरकर यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या कराड येथील भव्य समारंभात दिग्गज मान्यवर व कलाकारांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. डाकवे यांनी दिली. पुरस्काराबद्दल आशिष निनगुरकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.