Literature तरुणांसाठी प्रेम काव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश असलेल्या अहमदनगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे ता.१ डिसेंबर रोजी कल्याण रोडवरील जाधव लॉन येथे प्रकाशन होणार.
ज्येष्ठ कवी सखाराम गोरे हे मागील ६० वर्षापासून Literature साहित्यक्षेत्रात योगदान देत असून, काव्यलेखन करत आहे. त्यांचे हे सातवे पुस्तक व सहावा काव्यसंग्रह आहे. विविध स्तरावर त्यांच्या कवितांचे गायन-वाचन सुरु असते. त्यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गणराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘आलाप’चे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांच्या हस्ते होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी पुणे विद्यापीठ म.अ.मं.चे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे, मसापचे केंद्रीय सदस्य जयंत येलुलकर, ज्येष्ठ (Literature) साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालवे, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, जालिंदर बोरुडे, छायाचित्रकार शेवंतराव गोरे, माजी कलाशिक्षक हबीब मन्यार आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात गायक प्रा.आदेश चव्हाण हे कवी सखाराम गोरे यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सादर करतील. कवितांच्या साजाने सजलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संतोषकुमार गोरे, शिवप्रसाद गोरे, प्रकाशक प्रा.गणेश भगत यांनी केले.