अहमदनगर | १९ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Election विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस (ड्राय डे) कालावधीत १८ आणि १९ नोव्हेंबर या काळात अवैधपणे मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाबे चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन ४ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १५ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी दिली.
कोरडा दिवस (ड्राय डे) कालावधीत ७ हजार ९७० लिटर रसायन, ३०० लिटर हातभट्टी, १८ बल्क लिटर देशी, ४४.५२. बल्क लिटर विदेशी माल जप्त करण्यात आला.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरडे दिवस जाहीर करण्यात आले असून या दिवशी कोणत्याही प्रकारची अवैध मद्यविक्री होत असल्याचे आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉटस्अप क्रमांक ८४२२००११३३ अथवा ०२४१-२४७०८६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.