अहमदनगर | १७ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Election विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मतदानपूर्वीच्या दोन दिवस आधी म्हणजेच १८ नोव्हेंबर, २०२४ रोजीच्या सायं. ६ वाजेपासून ते मतदान संपल्यानंतर एक दिवसापर्यंत म्हणजेच २१ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव जमविण्यावर, एकत्रितपणे वावरण्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.