Politics: अरूण आनंदकर यांचा खाजगी अंगरक्षक घेवून कुलसचिव कार्यालयाचा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न - कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे; कुलसचिव प्रकरणाबाबत कृषि विद्यापीठाचा खुलासा - Rayat Samachar

Politics: अरूण आनंदकर यांचा खाजगी अंगरक्षक घेवून कुलसचिव कार्यालयाचा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न – कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे; कुलसचिव प्रकरणाबाबत कृषि विद्यापीठाचा खुलासा

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
64 / 100

राहुरी | १७ ऑक्टोबर| प्रतिनिधी

Politics महात्मा फुले कृषि विद्यापीठात कुलसचिव या पदावरुन प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यासंदर्भात महात्मा फुले कृषि विद्यापीठाने खुलासा दिला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले की, ता.८ ऑक्टोबर, २०२४ रोजी शासनाच्या कृषि मंत्रालयाच्या स्तरावरुन अरुण आनंदकर यांना कार्यमुक्त केले होते. या दिवशी ते कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालय सोडून गेले. त्यामुळे कार्यालयाचा शिपाई कार्यमुक्त आदेश आणि पदभार हस्तांतरण दस्तावर घेवून त्यांच्या घरी गेला असता त्यांनी तो आदेश स्वीकारला नाही आणि पदभार हस्तांतर दस्तावर सही करण्यास नकार दिला. शासनाच्या आदेशानुसार सदर आदेश स्वीकारणे त्यांनी गरजेचे होते. त्यांनी हा आदेश स्वहस्ते घेणे नाकारल्यामुळे त्यांना हा आदेश विद्यापीठाने ईमेल तसेच पोस्टाने आर.पी.ए.डी. द्वारे पाठविला. याचप्रकारे ते वारंवार कुलगुरुंच्या आदेशाचे उल्लंघन करुन त्यास केराची टोपली दाखवत असे.

 

वास्तविक विद्यापीठाचे कुलगुरु हे नियुक्ती आणि अनुशासनात्मक अधिकारी असल्याने त्यांचे आदेश पाळणे हे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या अशा वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने असे वागणे अशोभणीय आहे. त्यांना ता.८ ऑक्टोबर, २०२४ रोजी शासनाने कार्यमुक्त केले.

 

वि‌द्यापीठाने दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे, यासाठी डॉ. मुकुंद शिंदे यांची कुलसचिवपदी नियुक्ती केली. ता.९ ऑक्टोबर, २०२४ रोजी आनंदकर यांनी आदेशाचे पालन करुन मुळ आस्थापनेवर रुजु होणे आवश्यक होते. तथापी ते मा. मॅटमध्ये गेले. मा. मॅटने ता.११ ऑक्टोबर, २०२४ रोजी ‘जैसे थे’ चा निकाल दिला. ता.८ ते ११ ऑक्टोबर,२०२४ या कालावधीत डॉ. मुकुंद शिंदे यांच्याकडे कुलसचिवपदाचा पदभार होता. विद्यापीठाने मा. मॅटचा जैसे थे आदेश पाळला. यानंतर आनंदकर यांनी ता.१४ आणि १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी खाजगी अंगरक्षक घेवून कुलसचिव कार्यालयाचा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला, हे कायद्याला धरुन नाही. अशा महसुलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मा. मॅटचा आदेश समजु नये, ही एक शोकांतिका आहे. राज्याची विधानसभा निवडणुका जाहिर होवून आचारसंहिता लागल्यामुळे आनंदकर हे याच जिल्ह्यातील रहिवासी असल्याने शासनाने त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती कदाचीत केली असावी असे वाटते.

 

शासनाने त्यांची नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्तपदी पदस्थापना केल्याचे कळते. तत्कालीन कुलसचिव आनंदकर रुजु असतांना बरीच प्रकरणे प्रलंबीत होती. आनंदकर यांचे काळामध्ये त्यांचे विद्यापीठ कर्मचाऱ्यांशी आडकाठीचे वर्तन होते. त्यामुळे प्रशासकीय कामात दिरंगाई होत होती. आश्वाशीत प्रगती योजनेत १२/२४ मध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या वागणुकीचा नाहक त्रास झाला. त्यांना भेटायला गेलेल्या प्राध्यापकांना ते अपमानस्पद वागणुक देत असे. त्यांच्या या आडमुठी धोरणामुळे काही कर्मचारी कंटाळुन रजेवर गेले. त्यांच्या या बदलीमुळे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनीं सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील आठवड्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठासमोर विद्यापीठ प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले असतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व कुलसचिव डॉ. शिंदे यांनी अतिशय संवेदनशीलपणे मंत्रीमंडळाच्या कॅबीनेटसमोर हा विषय ठेऊन तो मंजुर करण्याची विनंती केली व विद्यापीठाच्या गेल्या बारा वर्षापासून प्रलंबीत असलेल्या महत्वाच्या समस्येला यश आले. डॉ. मुकुंद शिंदे यांनी कुलसचिवपद हाती घेतल्यापासून बरीच कामे मार्गी लावली. वि‌द्यापीठाला सध्याला एकच कुलसचिव असून याबाबत कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
Leave a comment