Education: पिंपरकने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठरणार साहित्य परिवर्तनाची नांदी; रानकवी तानाजी सावळे यांची काव्यमैफल संपन्न - Rayat Samachar

Education: पिंपरकने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठरणार साहित्य परिवर्तनाची नांदी; रानकवी तानाजी सावळे यांची काव्यमैफल संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
72 / 100

अकोले | १३ सप्टेंबर | प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरकने येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कडलग यांच्या सहकार्याने माजी विद्यार्थी रानकवी तानाजी सावळे यांच्या Education काव्यमैफिलचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख म्हणून शिक्षण व्यवस्था कमिटीचे उपाध्यक्ष माजी विद्यार्थी युवराज ठिगळे, पिंपरकनेचे उपसरपंच निवृत्ती ठिगळे, संदीप ठिगळे उपस्थित होते.

संजय कडलग यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी काव्यमैफिलीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी सहशिक्षिका वाकचौरे संगीता, सहशिक्षक खैरनार बाळू भास्कर, सहशिक्षक थोरात दत्तू भीमा यांच्या हस्ते निसर्गकवी तानाजी सावळे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.नवले राजेंद्र रामनाथ, प्रा.आहेर विनोद सुभाष, प्रा.पिचड संतोष सोपान आणि जबाबदार कर्मचारी लांघी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कविता ऐकुन टाळ्या वाजवत काव्य मैफिलीत आनंदाचे रंग भरला तसेच प्रेरणात्मक माहोल तयार झाला.

तानाजी सावळे यांच्या ‘सुगरण’ कवितेने मुलींना प्रोत्साहित केले.

“पोरी सोरींनो तुम्हीं, नवी सुगरण व्हावे ,

माहेरा वरून सासरी, सुगरणीचे बीज न्यावे”

अश्या अनेक बहारदार कविता सादर करून मुलांना लेखनाचे महत्व पटवून दिले.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी निसर्गकवी तानाजी सावळे हे १९३५ साली स्थापित प्तहत्शाल घेऊन साहित्यक्षेत्रात आपले अमूल्य योगदान देत आहेत. प्रलेस संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन लखनऊ या ठिकाणी झाले असून प्रलेसचे पहिले उद्घाटक राष्ट्रपिता ‘डॉ.रविंद्रनाथ टागोर’ होते. ‘गोदान’ कादंबरीचे लेखक ‘मुंशी प्रेमचंद ‘ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडले होते. कवी तानाजी सावळे यांनी आपल्या परिवर्तनवादी, निसर्गमय कवितांनी आपल्या सुमधुर आवाजात रचना सादर करत सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकवृंदाना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या रचना या देशाच वास्तववादी चित्रण डोळ्यापुढे हुबेहुब उभे करणाऱ्या आहेत. निसर्गात राहणाऱ्या, काबाडकष्ट करणाऱ्या, गोरगरिबांच्या वास्तवाशी निगडित असणाऱ्या व्यथांचे चित्रण करणाऱ्या आहेत. समाजाला प्रगतीशील बनवणाऱ्या आहेत. यात ‘डाघाळ’ धन जोंधळ दळीते, माय माझी जात्यावर , रानखोप, पीळ, लोकशाही व देशाच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या अधिकतम रचना या समाज सुधारण्यासाठी मशाल होऊन चालणाऱ्या आहेत.

प्राचार्य कडलग संजय मधुकर हे कवी तानाजी सावळे यांचे मराठीचे शिक्षक असल्याने त्यांची मराठीवरील पकड जास्त मजबूत झाली व साहित्याची आवड देखील त्यांनी त्याच वेळी सर्व मुलांना निर्माण करून दिली होती. “माणसानं सतत वाचन करत राहावं, कारण वाचन माणसाला कायम तरुण ठेवत असत ” व “वाचाल तर वाचाल” अश्या अनेक मूल्यांची रुजवण त्यावेळी प्राचार्य कडलग यांनी मुलांना करून दिली. याची आठवण कवींनी रचना सादर करतेवेळी सांगितली.

प्रा. खैरनाक नेहमी मुलांना सांगत की, प्रयत्न करा…प्रयत्न करा.. प्रयत्न करता वाळूचे कण रगडता तेलही गळे. असे जिवनव्यापी महत्वाचे संदेश ते मुलांना देत शिक्षण देत असायचे. याचीही आठवण करून दिली. राज्यशास्त्र व इतिहास मुलांच्या तोंडपाठ करून घेणारे शिक्षक या राज्यात आहेत याच जिवंत उदाहरण म्हणजे याच विद्यालयातील प्राध्यापक आहेर विनोद सुभाष, आजपर्यंत कोणताच विद्यार्थी या विषयात नापास झालेला नाही. इतक्या पोटतिडकीने शिकवणं हेच खरतर शिक्षण ममत्व आहे. आहेर सरांसारखे शिक्षक जर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले तर हा देश सुधारायला वेळ नाही लागणार.

यावेळी माजी शिक्षकवृंदांची देखील आठवण झाली यात प्रा.साने, प्रा.कानवडे, प्रा.तोरमल, माजी मुख्याध्यापक वाकचौरे, प्रा.काळे सर , कै.प्रा.फटांगडे, सर्वांचे आवडते कर्मचारी हांडे मामा, कर्मचारी बाळू मामा या सर्वांची आठवण करण्यात आली.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

Share This Article
Leave a comment