Women: स्त्री स्वरक्षण सत्राचे आयोजन गरजेचे - Rayat Samachar

Women: स्त्री स्वरक्षण सत्राचे आयोजन गरजेचे

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
75 / 100

वसई | २३ ऑगस्ट | मेल्सीना तुस्कानो परेरा

राज्यात सध्या Women बलात्कार, अत्याचाराचे प्रमाण कचऱ्यासारखे वाढले आहे. ३-४ वर्षांच्या मुलीही यात बळी पडत आहेत. खेळण्याच्या वयात त्यांच्यासोबत क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये केली जात आहेत. विचार करूनच अंगावर शहारे येतात, तळपायाची आग मस्तकाला जाते. शिवरायांच्या भूमीत हे असे नराधम कसे काय जन्माला येऊ शकतात.

काय अवस्था झाली असेल त्या मुलींची, त्यांच्यावर हा अन्याय होत होता. तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील, त्या कोवळ्या फुलांना काय समजते की काय झालं आहे आणि काय होतं हे.. विचार करण्यापलीकडे आहे हे सर्व. शाळेमध्ये जे कोणी कर्मचारी आहेत किंवा ज्यांना काम करण्याची संधी दिली जाते त्यांचे शिक्षण, ते कुठचे आहेत, त्यांचे मूळ नाव, त्यांची पार्श्वभूमी ही त्या शाळेतील मुख्यध्यापकाकडे असायला हवी आणि शाळेतील इतर शिक्षकांनाही माहिती असायला हवी. कारण मागील काही दिवसात

बदलापुरमधील आदर्श शाळा आणि पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मधील यादवेश विकास शाळा या दोन्ही शाळेत घडलेल्या त्या ताज्या प्रसंगानुसार आपली मुली शाळेत कशा पाठवायच्या? हा पालकांना पडलेला प्रश्न आहे.

छोटी मुले अज्ञान, अजान असल्याकारणाने ती पटकन थोड्याशा गोड बोलण्याने किंवा खाऊसाठी कोणाशीही बोलू लागतात किंवा कुठेही जातात आणि यासाठी मी सर्व पालकांना, शिक्षकांना आणि सर्व शाळांना विनंती करते की, आपण आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना घेऊन दर महिन्याला एकदा तरी जनजागृतीची सभा आयोजित करा. ज्यामध्ये छोट्या मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत सर्वांना एकत्रित करून Bad touch, good Touch यामधला फरक private parts आणि आपले संरक्षण कसे करायचे याबाबत चर्चा होण्यास हवी.

पालकांनी मुलींना घरीसुद्धा वेळोवेळी याबाबत मार्गदर्शन करावे, कराटे क्लासला पाठवावे जेणेकरून ७ वी पासूनच्या पुढच्या मुली आपल्या आजूबाजूला असणारी माणसे चांगली की वाईट हे ओळखू शकतील.

याची सुरुवात पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील सेंट जेम्स इंग्रजी हायस्कूल यांनी सुरू केली. शुक्रवारी ता. २३ ऑगस्ट रोजी शाळेत विद्यार्थीनीं समवेत ‘सुरक्षा प्रबोधन सत्र’ आयोजित केले होते. ज्यात ५ वी ते १० पर्यंतच्या मुलींना स्वतःची काळजी आणि सुरक्षा कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील शिक्षिका जेस्लिना लोपीस, आणि बीटा डिकून्हा यांनी मुलींना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच २५ ऑगस्ट रोजी आमची वसई सामाजिक संस्थेच्या वतीने वसई (पालघर जिल्हा) येथे स्त्री आणि स्वरक्षण यावर कार्यशाळा आयोजित केली आहे.

असे प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक संस्थेमार्फत जर सुरू झाले तर मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप आधाराची भूमिका असेल. 

बाकी आरोपींना काय आणि कशी शिक्षा देणार हे आपल्या हातात सरकार कधी देणारच नाहीत पण जे आपण करू शकतो ते तरी करून मुलींना सावध करून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. सोबतच मुलांनासुद्धा शाळेत शिकणारी मुलगी आपली बहीण आहे. तिचे संरक्षण कसे करावे, तिच्याशी कसे वागावे, याचे शिक्षण देणे गरजेचे आहे.

अन्यथा जागोजागी नराधम शिकार करण्यासाठी टपून बसले आहेत. शाळा नाही तर रस्त्यावर किंवा मंदिरातही. यासाठी सर्व शाळांमध्ये, सोसायटी व संस्थामध्ये मुलींसाठी, स्त्रीयांसाठी जनजागृती, आत्मनिर्भर, स्व रक्षण हे सत्र किंवा वर्कशॉप आयोजित करण्यास सुरुवात करावी.

लेखिका – मेल्सीना तुस्कानो परेरा

कृपया, वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area
Share This Article
2 Comments