Pollution:जिल्हा दुध संघाच्या जागेवरील साईमिडास AURUM वर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई; काम थांबविण्याचे आदेश; पर्यावरणावर प्रदूषणाचा घातक असा परिणाम होण्याची शक्यता

AURUM, साईमिडास बिल्डिंग, जिल्हा दुध संघ, झोपडी कँटीन परिसर, अहमदनगर
26 / 100 SEO Score

अहमदनगर | प्रतिनिधी

झोपडी कॅन्टीन परिसरातील जिल्हा दूध संघाच्या जागेवर उभी राहिलेली साईमिडासची AURUM BUSINESS HUB ही टोलेजंग इमारत आणखी अडचणीच्या भोवऱ्यामध्ये अडकत चालली आहे. या वादग्रस्त इमारतीचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्यांची परवानगी न घेतल्याने हे काम तात्काळ थांबवा, अशी मोठी कारवाई मंडळाने केल्याने अहमदनगरमध्ये लँडमाफिया आणि बांधकाम व्यवसायिकांच्या चर्चेत आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

यासंदर्भात काँग्रेस नेते दीप नारायण चव्हाण आणि शहर सहकारी बँकेचे विश्वस्त तथा हमाल पंचायतचे सल्लागार संजय घुले यांनी ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पूप्पाल यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली होती.

दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर हरितआयोग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची रीतसर परवानगी घ्यावी लागते. ती घेतली गेली नसल्याची तक्रार चव्हाण, घुले यांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांना त्यात त्रुटी आढळून आल्याने त्यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

मंडळाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना थेट आदेश काढून साईमिडास म्हणजेच ‘ऑरम बिजनेस हब अँड ओ आर ओ रेसिडेन्स‘ या इमारतीवर तात्काळ कारवाई करावी. सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवावे, असा थेट आदेश दिला आहे.

या संदर्भीय विषयास अनुसरून प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांनी २२ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये साई मिडास प्लॉट नंबर (४३+४४/१/१ व (४४+४४/१/२ फायनल प्लॉट नंबर ४४,४४/१ या प्लॉटवर सुरू असलेल्या बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून अनुमती पत्र आणि पर्यावरण विभागाचे संमती पत्र घेतले नसल्याने या इमारतीचे बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम औद्योगिक, व्यावसायिक किंवा घरगुती प्रकारात जर करायचे असेल तर या स्क्वेअर फुटात राहण्यास जाणाऱ्या लोकांकडून ते वापरत असलेले पाणी, हवा, अन्न यातून जो मैला तयार होईल. सांडपाणी गटारीत जाईल, हवा प्रदूषित Pollution होईल त्यानुसार त्या बांधकाम व्यावसायिकाने इमारतीत विशिष्ट तरतुदी करून मैला, कचरा विल्हेवाट लावण्याआधी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक असते. पण या ठिकाणी अधिकाऱ्यांना तसे काहीच दिसले नाही. ही इमारत जर पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर त्याचा अहमदनगरच्या पर्यावरणावर प्रदूषणाचा घातक असा परिणाम होण्याची शक्यता होती.

अगोदरच साईमिडासने महानगरपालिकेकडून मिळवलेल्या बांधकाम परवानगीत फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडकलेली आहे. आता हरित लवादाकडून परवानगी न घेतल्यामुळे हा प्रकल्प अहमदनगरकरांच्या जीवावर उठला की काय असा सवाल विचारला जातो आहे. या बिल्डिंगमार्फत तयार होणारा मैला थेट सारडा कॉलेज शेजारील असलेल्या नाल्यात सोडला जाईल आणि सिनानदीपर्यंतचे पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होईल. दुर्गंधी आणि घाणीचा त्रास आजूबाजूच्या नागरी वसाहतींसह अहमदनगरकरांना होईल. या धोक्यापासून मंडळाने शहरवासियांना वाचवले आहे आणि या बिल्डिंगचे बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *