अहमदनगर | प्रतिनिधी
भूखंडाच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सावेडीचे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी सागर एकनाथ भापकर व सर्कल शैलजा राजाभाऊ देवकाते अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी मार्च २०२४ मध्ये लाचेची मागणी केली होती. पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निप्षन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरणी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले होते. मंजुरी मिळाल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्ररदाराचा सावेडी १८ हजार चौरस फुटांचा भूखंड आहे. त्याचे २२ विभाग करून बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया त्यांनी केली. त्याचे अंतिम फेरफार ऑनलाइन अपलोड करण्यासाठी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती.