पाथर्डी | पंकज गुंदेचा
Pathardi तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामधे साहित्यरत्न लोकशाहीर Comrade अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरखनाथ रेपाळे होते. यावेळी आपल्या भाषणातून विजय भताने यांनी सांगितले की, अण्णाभाऊंच्या जीवनकार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन महान जीवन लक्ष प्राप्त करावे. इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी सिद्धी राजळे व सायली बाबर यांनी अण्णाभाऊंचे जीवनचरित्र आपल्या भाषणातून थोडक्यात सांगितले.
अध्यक्षीय भाषणात Headmaster गोरखनाथ रेपाळे यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महान समाजसुधारक, कवी, लेखक, साहित्यकार होते. ते निरक्षर असूनसुद्धा वाचन लेखनाची उच्च क्षमता प्राप्त करून महान साहित्यकार बनले. त्यांनी २५ कादंबऱ्या, ३ नाटके, १० पोवाडे, १४ तमाशे लिहिले. त्यांच्या ८ कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झाले. विद्यार्थ्यांनी त्यांची साहित्य प्रेरणा घ्यावी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शिवाजी लवांडे यांनी तर आभार शंकर बरकडे यांनी मानले.