'ग्राहक कल्याण सल्लागार समिती अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण' विभाग पाथर्डी तालुकाध्यक्षपदी अरविंद सोनटक्के तर शेवगाव तालुकाध्यक्षपदी रमेश जाधव यांची नियुक्ती - Rayat Samachar

‘ग्राहक कल्याण सल्लागार समिती अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण’ विभाग पाथर्डी तालुकाध्यक्षपदी अरविंद सोनटक्के तर शेवगाव तालुकाध्यक्षपदी रमेश जाधव यांची नियुक्ती

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

पाथर्डी | राजेंद्र देवढे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘ग्राहक कल्याण सल्लागार समिती अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण’ विभागाच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी अरविंद सोनटक्के व शेवगाव तालुकाध्यक्षपदी रमेश जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत तसेच गोरगरीब लोकांचे प्रश्न ग्राहक संरक्षण विभागामार्फत सोडवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीचे पत्र खा. निलेश लंके यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. नियुक्तीची शिफारस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रतापकाका ढाकणे, जिल्हाध्यक्ष गणेश सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष रामराव चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्याकडे केली होती. त्यांच्या सूचनेनुसार नियुक्त्या करण्यात आल्या.

निवडीबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, खा. निलेश लंके, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरीश भारदे, जिल्हा सरचिटणीस रामराव चव्हाण, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष बंडू पाटील बोरुडे, माधव काटे, जिल्हा उपाध्यक्ष विमुक्त जाती विभागाचे संजय वडते आदींनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share This Article
Leave a comment