Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > मुलांच्या आरोग्याबाबत पालकांनी जागृत राहणे गरजेचे – महेबुब शेख; युनिर्व्हसल डेंटल क्लिनिकच्यावतीने मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
अहमदनगरआरोग्यशिक्षण

मुलांच्या आरोग्याबाबत पालकांनी जागृत राहणे गरजेचे – महेबुब शेख; युनिर्व्हसल डेंटल क्लिनिकच्यावतीने मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 10.07.2024 7:20 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

अहमदनगर | आबिदखान दूलेखान

आज फास्टफूट, चॉकलेट, व्यायाम, मैदानी खेळांचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच चांगल्या सूचना देत असतात. परंतु त्या अंमलात आणण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. दातांची समस्या ही अनेक मुलांना जाणवत असते. त्याबाबत जागृत होणे गरजेचे आहे. आज मेहेर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थी दातांची काळजी घेतील. युनिर्व्हसल ट्रस्टच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध जागृतीपर उपक्रम घेतले जातात, त्याचप्रमाणे गरजूंना मदतीचाही हात दिला जातो, असे प्रतिपादन युनिवर्हसल ट्रस्टचे उपाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले.

युनिर्व्हसल एज्युकेशन ट्रस्टच्या युनिर्व्हसल डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने मेहेर इंग्लिश मेडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष महेबुब शेख, डॉ.सॉलेहा बागवान, डॉ. वैष्णवी गोरे, दिपा शिंदे, मास्टर मुस्तफा, प्राचार्या अनुरिता झगडे, समीना शेख, योगिता, पुनम, शितल, आशा आदि उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्या अनुरिता झगडे म्हणाल्या, शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषय जागृती व्हावी, लहानपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबवत असते. विद्यार्थीना सामाजिक जाणिवेतून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, याबरोबर कला-क्रिडा, स्पर्धा परिक्षांसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज युनिर्व्हल ट्रस्टचे शाळेत दंत तपासणीचा चांगला उपक्रम राबविला. याद्वारे विद्यार्थ्यांना दाताचे महत्व आणि त्याची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे ज्ञान मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली जागृती झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना शेख यांनी केले तर आभार योगिता मॅडम यांनी मानले. यावेळी सुमारे ३०० मुलांची दंत तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.

TAGGED:आरोग्य शिबीरदंत रोग तपासणी
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article खेळ ऊनपावसाचा; वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी टिपलेला निसर्गाचा अवचित क्षण
Next Article …आता मनपाची जबाबदारी यशवंत डांगेच्या खांद्यावर; देवीदास पवार नव्हे आता डांगे मनपा आयुक्त !
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरताज्या बातम्यामहानगरपालिका

Social | महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ उभी करून जनतेच्या हक्कांसाठी लढा उभारला- मुदगल; मनपा पतसंस्थेच्या वतीने अभिवादन

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?