अहमदनगर | प्रतिनिधी
अटकेत असलेला प्रविण लहारे (कर्जदार)नगर अर्बन बँक याचा जामीन अर्ज नामंजूर.
आरोपीतर्फे युक्तीवादात सांगितले गेले की त्याचे नांव मूळ फिर्यादीत नाही आरोपी हा गवंडी काम करणारा आहे व परिस्थिति ने अगदी गरिब आहे त्याने नगर अर्बन बँकेकडे 3 लाखाचे कर्जाची मागणी केली होती परंतु आर्थिक मापदंडे पुरेशी नसलेमुळे बँकेचे संचालक मंडळाने 3 लाखाचे कर्ज नामंजूर केले
कर्जाची कागदपत्रे बँकेतच राहीली होती बँकेचे वरिष्ठ अधिकारी चेअरमन व संचालक मंडळाने मनोज वासुमल मोतीयानी नामक व्यक्ति शी संगनमत करून माझे 3 लाखाचे कर्ज अर्जावर खाडाखोड करून त्यावर 3 कोटीचे कर्ज मंजूर केलेचे दाखवून ती सर्व रक्कम मनोज मोतीयानीचे खातेत वर्ग केली माझा या सर्व अफरा-तफरी मध्ये काहीही सहभाग नाही.
मी बँकेचे अधिकारी व संचालकांकडे अनेक तक्रारी केल्या परंतु त्यांनी काहीही कारवाई केली नाही.
सरकार पक्षातर्फे या जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की आरोपीचा सहभाग निश्चित झाला आहे त्याने बँकेचे चेअरमन संचालक मंडळ वरिष्ठ अधिकारी व मनोज मोतीयानी यांचे शी संगनमत करत बँकेची बँकेचे सभासद व ठेवीदारांची 3 कोटी रूपयांची फसवणुक केलेली आहे फसवणुकीचे रक्कमेतून मालमत्ता खरेदी केली आहे व ती मालमत्ता आरोपीचे नावावर खरेदी करणेत आली व तीच मालमत्ता नंतर कर्जाला तारण म्हणून दाखविली आहे मनोज मोतीयानी याने अद्याप 3 कोटी रूपयांची परतफेड केलेली नाही.
माननीय न्यायाधीश पी आर सित्रे साहेब यांनी जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की आरोपीने बँकेचे चेअरमन संचालक मंडळ वरिष्ठ अधिकारी व मनोज मोतीयानी नामक व्यक्ति शी संगनमत करून बँकेची,बँकेचे सभासदांची व ठेवीदारांची फसवणुक केलेचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे या केसचा पोलीस तपास सुरू आहे
तसेच या फसवणुकीमुळे गोर गरिब ठेवीदारांचा पैसा अडकलेला आहे मनोज मोतीयानी याने रक्कमेची परतफेड केलेली नाही..
म्हणून आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करणेत येत आहे..