Ad imageAd image

सॉल्ट नावाच्या वादळात वेस्ट इंडिजचं पानिपत, बेअरस्टोही चमकला

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २०.६.२०२४

इंग्लंडने गुरुवारी वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळवला आणि गट-२ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. त्याचवेळी, यजमान -१.३४३ च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर पोहोचले. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यांची निव्वळ धावगती +०.९०० आहे. तिसऱ्या स्थानावर सह-यजमान अमेरिका आहे, ज्याचा निव्वळ रन रेट -०.९०० आहे. चारही संघांना अजून दोन सामने खेळायचे आहेत.

ग्रोस आयलेट, सेंट लुसिया येथील डॅरेन सेमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने २० षटकांत ४ गडी गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १७.३ षटकांत २ बाद १८१ धावा केल्या आणि सामना ८ विकेट्स राखून जिंकला.

१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने या सामन्यात दमदार सुरुवात केली. फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी झाली. रोस्टन चेसने आठव्या षटकात कर्णधाराला पायचीत बाद केले. २२ चेंडूत २५ धावा करून तो बाद झाला. मोईन अलीच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रसेलने जॉन्सन चार्ल्सकरवी झेलबाद केले. त्य‍ाला केवळ १३ धावा करता आल्या. यानंतर जॉनी बेअरस्टोने सूत्रं स्वीकारली. त्याने फिलिप सॉल्टसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची नाबाद भागीदारी केली. डावाच्या १६व्या षटकात सॉल्टने रोमॅरियो शेफर्डला लक्ष्य केले आणि त्याने ३० धावा केल्या. चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. या सामन्यात सॉल्ट ८७ धावांवर नाबाद राहिला तर बेअरस्टो ४८ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून फक्त रसेल आणि चेस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाला ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी दमदार सुरुवात करून दिली. मात्र, पाचव्या षटकात मांडीच्या दुखापतीमुळे किंग निवृत्त झाला. तो १३ चेंडूत २३ धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर निकोलस पुरनने चार्ल्ससोबत पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली जी मोईन अलीने १२व्या षटकात भेदली. त्याने सलामीवीर चार्ल्सला ९४ धावांवर बाद केले. तो ३४ चेंडूत ३८ धावा करून परतला. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोव्हमन पॉवेलने खळबळ उडवून दिली. त्याने पूरनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. लियाम लिव्हिंगस्टोनने १५ व्या षटकात पॉवेलला बाद केले. तो ३६ धावा करू शकला. त्याचवेळी पुरणने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा काढल्या. या सामन्यात रसेलला एकच धाव करता आली. तर, रदरफोर्ड २८ धावांवर नाबाद राहिला आणि रोमॅरियो शेफर्ड पाच धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

फिलिप सॉल्टला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading