इंटेरियर डिझायनिंगमध्ये आकांक्षा गाडे तर फॅशन डिझायनिंगमध्ये निकिता मासुरे प्रथम; आय.एस.डी.टी.ची १००% यशाची परंपरा - Rayat Samachar

इंटेरियर डिझायनिंगमध्ये आकांक्षा गाडे तर फॅशन डिझायनिंगमध्ये निकिता मासुरे प्रथम; आय.एस.डी.टी.ची १००% यशाची परंपरा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) १९.६.२०२४

येथील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच आय.एस.डी.टी. या संस्थेच्या इंटेरियर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमांचे वर्ष २०२३-२४ चे निकाल जाहीर झाले असून डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईनमध्ये आकांक्षा गाडे हीने ८०.८१% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर प्रिती कराळे हिने ७२.५५% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. डिप्लोमा इन टेक्स्टाईल व फॅशन डिझायनिंगमध्ये निकिता मासुरे हीने ८३.७९% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर अमना पठाण हिने ८२.४०% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष विनायक देशमुख यांनी दिली.

अधिक माहिती देताना संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख यांनी सांगितले, २००४ साली स्थापन झालेल्या आय.एस.डी.टी. या संस्थेने २० वर्षे पूर्ण केले असून यावर्षी संस्था २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षी देखील संस्थेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून फॅशन डिझायनिंग व इंटरियर डिझाईन क्षेत्रातील आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. आय.एस.डी‌.टी. च्या यशामध्ये संस्थेचे प्राचार्य आर्कि. अरुण गावडे, महेश बालटे, शिरिष गावडे, प्रणव भोसले, पूजा पतंगे, मेधा आसणे, स्मिता बडाख, कोमल बिडकर, सानिका बार्शीकर, पूजा धट, रोहन चारगुंडी यांचा मोठा वाटा असून विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच हे यश प्राप्त करणे शक्य झाले आहे.

फॅशन डिझायनिंग व इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम चालविणारी व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याशी संलग्न असणारी आय.एस.डी.टी. ही जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शासनाच्या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा इन टेक्स्टाईल व फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग या अभ्यासक्रमासाठी सध्या प्रवेश सुरू असुन दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना बजाज फायनान्समार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

प्रवेशासाठी आय.एस.डी.टी., निर्मल चेंबर्स मागे, हार्मो केअर लॅबसमोर, लालटाकी, अहमदनगर, (०२४१ – २४३००२३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य आर्किटेक्ट अरुण गावडे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment