नवी मुंबई | २२.४ | रयत समाचार
(Crime) महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाशी संबंधित बिल प्रकरणात उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
(Crime) या कारवाईमुळे राज्यातील सर्वच महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, जनतेत पुन्हा महानगरपालिकांमधील नगररचना आदींसह विविध विभागातील लाचखोरींच्या आकड्यांच्या चर्चा सुरू आहेत.
(Crime) आपल्या महानगरपालिकेत अशा कारवाई का होत नाहीत असेही, स्थानिक नागरिक प्रश्न विचारत आहेत. लाचखोरीची कारवाई झालेले कर्मचारी थेट ‘महापौरांचे पीए’ होत असल्याने नागरिकांमधे खुद्द महापौरांबाबत संशय निर्माण होत आहे.
अशा लाचखोर अधिकारी वर्गामुळे इमानदार कर्मचारी, अधिकारी यांची मोठी कुचंबना होत आहे. अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कारभारावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
