Literature | ‘टेकडीवरचे गूढ’ चित्रकथा प्रकाशित; व्यंगचित्रकार घन:श्याम देशमुख यांचे स्वप्न साकार

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १२.४ | रयत समाचार

(Literature) ‘टेकडीवरचे गूढ’ ही स्वतः लिहिलेली आणि स्वतः रेखाटलेली चित्रकथा पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाल्याची माहिती व्यंगचित्रकार घन:श्याम देशमुख यांनी दिली. श्रीविद्या प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून, त्यांच्या सर्जनशील प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

(Literature) याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, अमर चित्रकथा वाचून आणि पाहून मी चित्रकार होण्याचे स्वप्न पाहिले होते. आज माझंच चित्रकथेचं पुस्तक प्रकाशित झालं, हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे.

Literature

(Literature) ते पुढे म्हणाले, येथून पुढे माझी आणखी अनेक पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस असून त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. नेहमी वाटायच, ‘यह एक दिन में नहीं होगा, लेकिन एक दिन जरूर होगा.’ आज ते स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.
या प्रकाशनामुळे सर्जनशील क्षेत्राला चालना मिळणार असून, नवोदित चित्रकारांसाठीही देशमुख यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Share This Article