संगमनेर | २४.३ | रयत समाचार
(Women) महाराष्ट्रातील महिला कामगारांच्या प्रश्नांवर आधारित वेबिनारचे आयोजन ३१ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर प्रमुख वक्त्या म्हणून सहभागी होणार आहेत.
(Women) ॲड. शिवूरकर गेली ४५ वर्षांहून अधिक काळ महिला मुक्ती आंदोलन, लोकशाही समाजवादी चळवळी तसेच वंचित महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांवरही सातत्याने आवाज उठवला आहे.
या वेबिनारमध्ये महाराष्ट्रातील महिला कामगारांची परिस्थिती, त्यांच्या समस्या आणि संघर्ष यावर त्या मार्गदर्शन करणार आहेत.
(Women) वेबिनार दुपारी ३ वाजता (IST) आयोजित करण्यात आला असून इच्छुकांनी bit.ly/WWMaharashtra या लिंकवर नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
