मुंबई | २४.३ | रयत समाचार
(Cultural Politics) अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या संतपरंपरेला धक्का देणारी ही घटना असल्याचे त्यांनी म्हटले.
(Cultural Politics) राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा यांसारखी महान व्यक्तिमत्त्वे दिली. मात्र आज अशा प्रकारच्या भोंदूगिरीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
(Cultural Politics) या प्रकरणात महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपांवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. दैवी शक्तीच्या नावाखाली जर स्त्रियांचं शोषण होत असेल, तर हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे, असे ते म्हणाले.
सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. हे सर्व सुरू असताना प्रशासनाला माहिती का नव्हती? असा सवाल त्यांनी केला.
तसेच, या प्रकरणाचा राजकीय वापर होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. माध्यमांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहावे आणि सत्य बाहेर आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
