🏠 📰 📍 🔍 ☎️

Religion | ओम गोरक्ष योग आश्रममध्ये २५ वी महाशिवरात्र विशेष उत्साहात साजरी होणार; नाथभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नगर तालुका | १५.२ | दिपक शिरसाठ

(Religion) यंदाची महाशिवरात्र ही ‘ओम गोरक्ष योग आश्रम’ या ध्यानमंदिरासाठी अत्यंत विशेष महत्त्वाची ठरणार आहे. गुरू नाथभक्त लक्ष्मण रभाजी वांढेकर गुरुजी (अण्णा) यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आणि सर्व भक्तांच्या सहकार्याने अव्याहत सुरू असलेले हे ध्यानमंदिर यंदा आपल्या पंचविसाव्या (२५ व्या) महाशिवरात्रीचा पवित्र सोहळा साजरा करीत आहे.

(Religion) यानिमित्त सोमवारी ता. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होम पूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसाद भंडारा सुरू होणार आहे.

(Religion) भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुर्णानंद वांढेकर व कुटुंबीयांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण ओम शिव गोरक्ष आश्रम, वांबोरी फाटा, शेंडी, अहिल्यानगर असून अधिक माहितीसाठी 9930008246 या क्रमांकावर संपर्क करावा. सोबत Google Map Link :
https://maps.app.goo.gl/xYzrip5eLaHmvWam8?g_st=aw देण्यात आली.

 

Share This Article