मुंबई | २३.१ | रयत समाचार
(Politics) दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी अजितपवार काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर पूर्ण न्याय मिळाला. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेला खटला न्यायालयाने रद्दबातल ठरवत भुजबळांसह एकूण १४ जणांना दोषमुक्त केले. यामुळे त्यांच्या निर्दोषतेवर न्यायालयीन शिक्कामोर्तब झाले.
(Politics) महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात सुमारे ८५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटक होऊन जवळपास दोन वर्षे कारावास भोगावा लागला. मात्र, याआधीच राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना दोषमुक्त ठरविले होते.
(Politics) मुख्य गुन्हाच सिद्ध न झाल्याने पुढे ईडीनेही दोषमुक्तीची भूमिका घेतली होती. त्यानंतर हा खटला न्यायालयात गेला. सविस्तर सुनावणीनंतर न्यायालयाने ईडीचा खटला रद्द करत भुजबळ यांची संपूर्ण सुटका जाहीर केली.
या निर्णयामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याचा शेवट झाला असून, भुजबळ समर्थकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा हा निर्णय मानला जात आहे.
