Maharani Kamsundariji: दरभंगा राजघराण्याच्या अंतिम महाराणी कामसुंदरीजी यांचे निधन

मिथिलेच्या संस्कृतीचा तेजस्वी दीप विझला

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

दरभंगा | रयत समाचार

Maharani Kamsundariji: ‘ईसमाद‘च्या संपादिका कुमूदसिंह यांच्या आजी तथा बिहारमधील ऐतिहासिक दरभंगा राजघराण्याच्या अंतिम महाराणी, महाराजाधिराज स्व. कामेश्वरसिंह यांच्या धर्मपत्नी महाराणी कामसुंदरी यांचे काल ता.१२ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता सकाळी निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने केवळ दरभंगा राजपरिवारावरच नव्हे, तर संपूर्ण मिथिला प्रांतावर शोककळा पसरली.

Maharani Kamsundariji

सादगी, उच्च संस्कार, धर्मनिष्ठा आणि लोकमंगल यांचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे महारानी कामसुंदरीजी यांचे जीवन मिथिलाच्या गौरवशाली सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक होते. राजवैभव असूनही त्यांनी सदैव साधे, संयमी व सेवाभावी जीवन जगणे पसंत केले. त्यामुळे त्या जनसामान्यांमध्ये अत्यंत आदराने ओळखल्या जात होत्या.

महारानी कामसुंदरीजी (Maharani Kamsundariji) यांनी आयुष्यभर धर्म, संस्कृती, सामाजिक समरसता आणि लोककल्याणाशी नाते जपले. मिथिलातील धार्मिक परंपरा, सांस्कृतिक विधी, मंदिर व्यवस्था तसेच सामाजिक उपक्रमांना त्यांनी मूक पण प्रभावी पाठबळ दिले. त्यांच्या कार्यातून दरभंगा राजघराण्याची नैतिक व सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम झाली.

महारानींचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तिमत्त्वाचे निधन नाही, तर मिथिलाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवासातील एका महत्त्वपूर्ण युगाचा अंत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आयुष्याने राजसत्ता, संस्कृती आणि सेवाभाव यांचा समन्वय कसा असावा, याचा आदर्श समाजासमोर ठेवला.

Maharani Kamsundariji

दरम्यान, दरभंगा राज परिवार, सामाजिक संस्था, धार्मिक संघटना तसेच मिथिलावासी नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. अनेक मान्यवरांनी महारानी कामसुंदरीजी (Maharani Kamsundariji) यांच्या निधनाला ‘मिथिलेचा सांस्कृतिक दीप विझला’ असल्याचे नमूद केले आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading