Election | अहिल्यानगर मनपा निवडणूकीसाठी 3 लाख 7 हजार मतदार; यादी जाहीर; QR code scan करून आपले नाव शोधा

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर  | २०.११ | रयत समाचार

(Election) अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकूण ३,००,७०० मतदारांचा समावेश आहे. १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीची विभागणी करून प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली, असल्याची माहिती प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

(Election) प्रभागनिहाय मतदारसंख्येत मोठी तफावत दिसून येते. प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक २२,४९५ मतदार असून, प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वांत कमी १४,८३० मतदार नोंदले गेले आहेत. प्रभाग क्रमांक १ ते १७ या सर्व प्रभागांची मतदारयादी स्वतंत्ररित्या छापण्यात आली आहे.

Election
QR code scan करून मतदारयादीत आपले नाव शोधा

(Election) महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी आपल्या नावाची नोंद झाली आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. मतदारांनी https://amc.gov.in/election/ या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव शोधून खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

Share This Article