पारनेर | २९.१० | रयत समाचार
(Rip news) तालुक्यातील कडूस गावातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्त्व ह.भ.प. कॉ. शिवाजीबापू आप्पाजी गायकवाड यांचे आज बुधवारी ता.२९ रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते उद्योजक संतोष गायकवाड यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने कडूस आणि परिसरावर दुःखाचे सावट पसरले.
(Rip news) बापूंचा अंत्यविधी गुरूवारी ता. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कडूस स्मशानभूमी येथे होणार आहे.
(Rip news) बापूंनी आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी कार्य केले. श्रमिक वर्ग, शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्याचबरोबर त्यांनी वारकरी संप्रदायातील ‘संत आनंदाश्रम दिंडी सोहळा’ सुरू करून तो अखंडपणे चालविण्याचे कार्य समर्थपणे पार पाडले. सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य होते.
त्यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळ, वारकरी परंपरा आणि समाजकारणाचे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
