Politics | आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; सुजात आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे ‘जाब दो आंदोलन’

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर |२६.१० | रयत समाचार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंबआ’चे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सुमित संतोष वर्मा याला जाब विचारण्यासाठी सोमवारी ता. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व राजगृहनिष्ठ भीमसैनिक एकत्र जमणार आहेत.

या आंदोलनाचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले. त्यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशातील आणि विचारधारेचे वारसदार असलेल्या सुजात आंबेडकरांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरणे म्हणजे थेट आंबेडकरी समाजाच्या स्वाभिमानावर प्रहार आहे. अशा वक्तव्यांना भीमसैनिक माफ करणार नाहीत.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व शहर पदाधिकारी, तसेच राजगृहाशी निष्ठा असणारे सर्व आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती साठे यांनी दिली.

भीमसैनिक एकजूट दाखवत, आंबेडकरी प्रतिष्ठेचा जाब दो आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणे नोंदवला जाणार आहे.

Share This Article