अहमदनगर | २१.१० | रयत समाचार
(Social) येथील जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी अत्यंत आगळीवेगळी पद्धतीने साजरी केली. शहरातील ऐश्वर्य, रोषणाई आणि फटाक्यांच्या गजबजाटापासून दूर जाऊन त्यांनी नगर तालुक्यातील कामरगावजवळील पारधी बांधवांच्या पालावर भेट देत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली.
(Social) यावेळी त्यांनी मुलांना मिठाईचे वाटप केले, तसेच महिलांना साडीचोळीचे संच भेट म्हणून दिले. सामाजिक जाण आणि पोलिसांचे मानवीरूप प्रतिबिंबित करणारा हा उपक्रम पाहून परिसरातील ग्रामस्थ भारावून गेले.
(Social) यावेळी पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, ‘लोकमत’चे सुधीर लंके तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते.
पारधी समाजातील बांधवांसोबत साजरी केलेली ही दिवाळी ‘लोकसेवा हीच, खरी मानवसेवा’ या भावनेचा संदेश देणारी ठरली. एसपी घार्गे यांच्या या सामाजिक संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
