Social | इतर भाषांना लिपी नाही, त्यामुळे त्या भाषांमध्ये साहित्य उपलब्ध नाही- सोनवणे; अभिजात मराठी भाषा सप्ताहनिमित्त ग्रंथ प्रदर्शन, वाचक संवाद कार्यक्रम
(Social) वाचाल तर वाचाल या उक्तीचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. मराठी भाषेला देवनागरी लिपी आहे. त्यामुळे मराठी साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे ज्ञानाचे भांडार आपल्याला उपलब्ध झाले आहे. इतर भाषांना लिपी नाही त्यामुळे त्या भाषांमध्ये साहित्य उपलब्ध नाही असे प्रतिपादन श्रीमती यु.बी. सोनवणे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव वाघा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले.
(Social) मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीने विविध पुरावे सादर केले. त्यातील बहुसंख्य प्राचीन पुरावे, ग्रंथ,शिलालेख आपल्या आईला नगर जिल्ह्यातील आहेत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ग्रंथ हस्तलिखित जतन करण्याचे काम सार्वजनिक ग्रंथालय मार्फत केले जात आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. पुस्तक वाचनाने बुद्धी तल्लख होते. असे प्रतिपादन साहित्यिक रामदास कोतकर यांनी केले. श्रद्धा सार्वजनिक वाचनालय , पिंपळगाव वाघा या वाचनालयात मार्फत अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन व वाचक संवाद कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की मोबाईलमुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दूर जात आहे. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी ‘यात्रा आमच्या गावाची’ ही कविता ही सादर केली.(Social) याप्रसंगी प्राथमिक शाळेच्या उपशिक्षका निघुट मॅडम व आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष, महादेव गवळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव वसंत कर्डिले यांनी केले आभार प्रदर्शन ग्रंथपाल, श्रीमती यमुना कांडेकर – कर्डिले यांनी केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आदिनाथ वाबळे जाधव मामा तेजस कर्डिले, शालेय विद्यार्थी शिक्षक वाचक सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.