India news | प्रवाशांच्या सोयीसाठी ऐतिहासिक पाऊल- हरजीतसिंह वधवा; बीड-नगर रेल्वेसेवेचा शुभारंभ

अहमदनगर | १८ सप्टेंबर | प्रतिनिधी

(India news) बीड जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बीड ते अहिल्यानगर या नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ बुधवारी ता.१७ सप्टेंबर रोजी करण्यात आला. ऐतिहासिक अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर या नव्या गाडीस हार्दिक स्वागत करण्यात आले.

 

(India news) जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचे मुख्य चालक अतिक शेख आणि सहाय्यक चालक जितेंद्र बी. यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. स्वागत सोहळ्याला जिल्हा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंह वधवा, स्टेशन मास्तर सुधीर महाजन, तसेच अशोक कानडे, अनिल सबलोक, प्रशांत मुनोत, अशोक शिंगवी, संदेश रपारिया, राजू वर्मा, विपुल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

 

(India news) रेल्वेसेवेच्या प्रारंभामुळे बीड ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते बीड या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होईल.

 

यावेळी हरजीतसिंह वधवा यांनी सांगितले की, बीडकरांची अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाली आहे. ही रेल्वेसेवा म्हणजे बीड आणि अहिल्यानगरच्या जनतेसाठी जीवनवाहिनीच ठरणार आहे. विद्यार्थ्यांपासून व्यापारी, नोकरदार, रुग्णसेवा घेणारे रुग्ण अशा सर्वच प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल.

 

रेल्वेच्या या ऐतिहासिक सुरुवातीमुळे नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार असून, सोयीस्कर प्रवासाची नवी दारे खुली झाली आहेत.

 

Share This Article