नाशिक | २६ ऑगस्ट | प्रतिनिधी
(Politics) मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरून राजकीय वाद अधिकच चिघळत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव खुडे यांनी थेट रा.स्व.संघ भाजपवर निशाणा साधत परखड सवाल उपस्थित केला आहे.
(Politics) खुडे म्हणाले, मराठा आरक्षणाविरुद्ध १३ जणांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यातील ८ याचिका सचिन कुलकर्णी, विष्णू मिश्रा, उदय ढोबळे, अमित गुगळे, आदित्य शास्त्री, गिरीश, कमलाकर दरवाडे आणि संजीव शुक्ला या ब्राह्मण व्यक्तींनी दाखल केल्या आहेत. त्याशिवाय देवेंद्र जैन, सागर सारडा हे जैन समाजातील असून जयश्री पाटील या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. एकमेव याचिकाकर्ता शफी अहमद हा मुसलमान होता.
(Politics) खुडे यांनी पुढे प्रश्न केला की, या सर्व याचिकाकर्त्यांचा भाजपाशी संबंध असणे हा केवळ योगायोग आहे का? की यामागे ठराविक राजकीय डावपेच दडलेले आहेत?
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच पेटलेल्या राजकारणात या वक्तव्यामुळे नवी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
