सांगली | १७ ऑगस्ट | रयत समाचार
(Politics) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘तातडीने कारवाई’ करत सामान्यांचा विश्वास जिंकला. मिरज येथील आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या कार्यालयात ता.१६ ऑगस्ट रोजी समस्त मुस्लिम समाज समितीच्यावतीने मशिदीवरील स्पीकर परवाना मिळावा ही मागणी करण्यात आली.
(Politics) या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी तत्काळ सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. घुगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परवाना प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले.
(Politics) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते जब्बारभाई बारस्कर, ॲड. ए.बी. मुरसल, शमशुद्दीन तुरीवाले, मेहबूबभाई मणेर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीची दखल पाहता उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.