India news | महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन कार्याध्यक्षपदी ॲड. भाग्यश्री बोरा

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

पुणे | २६ जुलै | शफीक बागवान

(India news) महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील ॲड. भाग्यश्री सुनील बोरा यांची नियुक्ती झाली. श्रीरामपूर येथील कोठारी ॲडव्हर्टायझिंगचे संचालक ललीत कोठारी यांच्या ॲड. भाग्यश्री बोरा मेहुणी आहेत.

(India news) ॲड. भाग्यश्री बोरा यांना २००४ मध्ये वकिली सनद मिळाली. २००९ पासून त्यांनी स्वतंत्र न्यायालयीन प्रॅक्टीस सुरू केली. त्या दिवाणी, फौजदारी व महसूल न्यायालयामध्ये पक्षकारांस न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. २००९ पासून त्यांची नोटरी ॲडव्होकेट भारत सरकार म्हणून नियुक्ती झाली.

 (India news) शिरुर तालुका वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची यापूर्वी बिनविरोध निवड झाली. ॲड. भाग्यश्री बोरा या शिरुर तालुक्यातील सोसायटीचे प्रश्‍न, मिळकतीचे व्यवहार, नोंदणीचे काम पाहतात. त्या ८ बँकांच्या कायदेशीर सल्लागार असून शिरुर, पुणे, अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत आहेत.
 दस्त नोंदणीचा १८ वर्षांपासून आणि नोटरी अधिकारी म्हणून २०१९ पासून कार्यरत आहेत.
त्यांचा कामाचा अनुभव विचारात घेवून महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
वकिली व्यवसायाच्या प्रगतीमध्ये ॲड. सतिष धोका, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ॲड. सय्यद अली, ॲड . यशवंत खराडे, ॲड. नितेश ललवाणी, ॲड. प्रविण नागवडे, ॲड. महावीर कांकरिया, ॲड. शोभा कड व असोसिएशनमधील पदाधिकारी ॲड. संजय वाखारे, विरेंद्र सावंत यांच्यासह शिरुर न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
ॲड. भाग्यश्री बोरा यांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *