Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > आंतरराष्ट्रीय > World news | निमिषा प्रियाची फाशी तूर्तास थांबवली; कंठपुरम मुसलियार यांचा ऐतिहासिक हस्तक्षेप; ऐतिहासिक धर्मसामंजस्य
आंतरराष्ट्रीयकायदादेशधर्ममहिला

World news | निमिषा प्रियाची फाशी तूर्तास थांबवली; कंठपुरम मुसलियार यांचा ऐतिहासिक हस्तक्षेप; ऐतिहासिक धर्मसामंजस्य

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 15.07.2025 7:02 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
उपसंपादक | दिपक शिरसाठ
SHARE
Highlights

ऐतिहासिक धर्मसामंजस्य

रयत समाचार | १५ जुलै | प्रतिनिधी

(World news) भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा थांबवण्यात यश मिळाले आहे. ही शिक्षावली १६ जुलै रोजी अमलात येणार होती. मात्र, एका ऐतिहासिक धर्मसामंजस्याच्या प्रयत्नांमुळे ती तूर्तास टळली आहे.

(World news) काय आहे निमिषा प्रिया प्रकरण? केरळमधील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय निमिषा प्रिया या परिचारिकेवर २०१७ मध्ये येमेनमध्ये स्वतःच्या पतीसारख्या सहकाऱ्याच्या हत्या करून त्याचे शरीर तुकडे करून पिशवीत भरल्याचा आरोप करण्यात आला होता. हा सहकारी तिच्यावर अत्याचार करत होता, असा तिचा दावा होता.

(World news) तिच्यावर येमेनमधील न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून तिच्या सुटकेसाठी भारतात आणि विशेषतः केरळमध्ये मोठा जनआंदोल चालू होता.
भारत सरकारची भूमिका आणि अपयश : निमिषाला वाचवण्यासाठी भारत सरकारकडून यामध्ये राजनैतिक हस्तक्षेपाचे प्रयत्न सुरू होते, परंतु ते पुरेसे प्रभावी ठरत नव्हते. फाशीची तारीख जशी जवळ आली, तशी चिंता वाढत गेली.
कंठपुरम मुसलियार यांचे निर्णायक पाऊल : या सर्व पार्श्वभूमीवर, भारतीय ग्रँड मुफ्ती आणि सुप्रसिद्ध सुन्नी धर्मगुरू कंठपुरम ए.पी. अबुबकर मुसलियार यांनी धर्माच्या माध्यमातून हस्तक्षेप करत एक नवीन आशेचा किरण निर्माण केला. त्यांनी येमेनमधील प्रमुख इस्लामी विद्वानांशी संपर्क साधत माफीसाठी पुढाकार घेतला.
त्यांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून क्षमा मागण्याचे आवाहन केले. त्यांच्या मध्यस्थीनंतर येमेनी प्रशासनाने फाशी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
पुढचा टप्पा – शिक्षा माफ होणार का? ह्या स्थगनामुळे आता निमिषाला पूर्णपणे माफ केले जाईल काय, याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. शरियत कायद्यानुसार, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी क्षमा केली तर शिक्षा माफ केली जाऊ शकते.
जनतेत समाधान व आशा : या बातमीमुळे निमिषाच्या कुटुंबियांना आणि देशभरातील समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केरळसह देशभरातून “धन्यवाद कंठपुरम!” अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
TAGGED:World newsकेरळनर्सयेमेन
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Crime | अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल- पोलिस प्रशासन; दहा किलोहून अधिक गांजा जप्त
Next Article Culture | पिंपळगाव माळवीत लक्ष्मीआई यात्रा उत्साहात संपन्न
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?