अहमदनगर | २ जुलै | प्रतिनिधी
(Politics) भारतीय जनता पार्टीचे श्रीगोंदा येथील आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत या कार्यास हातभार लावला.
(Politics) यावेळी मिनर्व्हा इन्फ्राचे इंजि. अनिस शेख, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, विद्यमान नगरसेवक असिफ सुलतान, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बारुदवाले हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
(Politics) कार्यक्रमानंतर उपस्थितांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले असून स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
