Politics | दादासाहेब गिते यांचे भाजपा सावेडी मंडलाच्या वतीने स्वागत

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

अहमदनगर | २० जून | प्रतिनिधी

(Politics) जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच दादासाहेब भागुबाई रघुनाथ  गिते यांनी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलाच्या वतीने त्यांचा शाल व पुस्तक देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला.

 

(Politics) या स्वागत समारंभास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सीए राजेंद्र काळे, अशोकराव गायकवाड, माजी नगरसेविका मनिषा बारस्कर – काळे तसेच उपजिल्हाधिकारी मनिषा राशिनकर उपस्थित होते.

 

(Politics) दादासाहेब गिते यांच्या नव्या जबाबदारीसाठी सर्व उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व नगरच्या प्रशासनाच्या विकासात्मक वाटचालीसाठी त्यांनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Politics

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *