नेवासा | रावसाहेब राशिनकर
(education) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. दीपक शिंदे होते.
(education) कार्यक्रमाला संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, सरपंच रावसाहेब कान्हु दहातोंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब जावळे, शालेय समिती सदस्य प्रा. अशोक चौधरी, माजी पर्यवेक्षक एन. टी. शिंदे, पोलीस पाटील कैलास अभिनव, शहाजी धुमाळ, बंडू दहातोंडे, अशोक कुंडलिक चौधरी, संजय दहातोंडे, दिपक जावळे, विजय रक्ताटे, पत्रकार देविदास चौरे, तसेच प्राचार्य डॉ. शिवाजी सावंत, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, समन्वयक प्रा. भाऊसाहेब तांबे, प्रसिद्धीप्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(education) शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयोजित या स्वागत समारंभात इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुलांचे हार, बिस्किट पाकिटे व मोफत पाठ्यपुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
प्रा. अशोक चौधरी यांच्या पुढाकाराने शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रुख्मिणी सोनवणे, कला शिक्षक स्वप्निल मालवंडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या स्वाती दळवी व प्रा. भाऊसाहेब तांबे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप शेंडगे यांनी केले.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
