Democracy | प्रत्येक मतदारयादी ऑनलाइन करा- निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे

जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी मागणी

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

Democracy

नाशिक | ११ जून | प्रतिनिधी

(Democracy) निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदार याद्या सार्वजनिकपणे वेबसाइटवर उपलब्ध कराव्यात, अशी ठाम मागणी निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केली. त्यांनी म्हटले की, मतदार नोंदणीसंबंधित कोणताही बदल, नावनोंदणी, वगळणे, स्थलांतर हे सर्व माहिती तात्काळ ऑनलाइन दिसणे आवश्यक आहे. यामुळे अनावश्यक वादविवादांना आणि गैरसमजांना पूर्णविराम देता येईल.

(Democracy) महेश झगडे हे प्रशासनातील पारदर्शकतेसाठी ओळखले जात असून त्यांनी आपल्या निवृत्तीनंतरही विविध सार्वजनिक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. त्यांनी सुचवलेली ही शिफारस निवडणूक आयोगासाठी मार्गदर्शक ठरू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

(Democracy) सध्याच्या यंत्रणेत मतदार सूचीमध्ये बदलांची माहिती तातडीने उपलब्ध न होण्याने अनेक वेळा नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर झगडे यांच्या या मागणीला व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि सहभाग वाढविण्यासाठी ही मागणी निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचारात घ्यावी, असे मत अनेक निवडणूक अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्तेही मांडत आहेत.

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *