पर्यावरणाचा अभिनव उपक्रम
अहमदनगर | १० जून | प्रतिनिधी
(Women) वटपौर्णिमेचे औचित्य साधत कृष्णाली फाऊंडेशनच्यावतीने आगळा-वेगळा व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक संवेदनशीलता आणि निसर्गप्रेम यांचा सुंदर संगम घडवत या दिवशी महिला पोलीस अधिकारी, महिला लोकप्रतिनिधी तसेच एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
(Women) धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून वडाचे झाड म्हणजेच कल्पवृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या झाडातून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे देशी वृक्षप्रजातींच्या संवर्धनासाठी हे वृक्षारोपण विशेष ठरले. यामध्ये एकल महिलांना सहभाग देत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
(Women) या कार्यक्रमात पोलीस दलातील पीएसआय शितल मुंगडे, हेड कॉन्स्टेबल वैशाली पठाडे, पोलीस नाईक योगिता साळवे, कॉन्स्टेबल सोनाली भागवत यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. तसेच नगरसेविका वैशाली नळकांडे, सविता शिंदे आणि जयश्री देवतरसे यांच्यासह परिसरातील महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी माजी महापौरा रोहिणी शेडगे, पत्रकार प्रियंका पाटील शेळके, उपाध्यक्ष गायत्री बागडे, आशा शेळके, ताराबाई शिंदे, साधना गरड, शुभांगी भगने, भारती कोमकुल, जयश्री सोनवणे, सुवर्णा इरोळे, ज्योती रासकर, कामिनी बोराडे यांचा उपस्थितीत सहभाग होता.
बालाजी फाऊंडेशनने या उपक्रमाला विशेष सहकार्य दिले. अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे, राज ठाणगे, गणेशनगर सोसायटी चेअरमन गणेश शिंदे यांनीही या उपक्रमात आपली उपस्थिती आणि पाठबळ दिले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा गुलाबाच्या रोपाचे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. एकंदरीतच महिलांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
