(Politics) सिद्धार्थनगरसारख्या दाट लोकवस्तीत साचलेल्या कचर्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक धनंजय कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगेंना दिला.
(Politics) माजी नगरसेवक जाधव यांनी आयुक्त डांगेंना दिलेल्या निवेदनात सांगितले की, प्रभाग क्रमांक ०९ मधील सिद्धार्थनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा न उचलल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पालिकेचे अनेक कर्मचारी वास्तव्यास असून, करंदीकर हॉस्पिटल व महानगरपालिकेचे आरोग्य मंदिरही याच परिसरात आहे.
(Politics) पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, “कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, अनेक नागरिक आजारी पडत आहेत.” आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणीच साचलेला कचरा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“तत्काळ कचरा उचलण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे. अन्यथा नागरिकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा धनंजय जाधव यांनी दिला.