Suprime Court | सरन्यायाधीश गवई यांचा अपमान आंबेडकरी विचारधारेमुळे केला का?प्रोटोकॉल उल्लंघनावरून नाना पटोले यांचा सवाल

राष्ट्रपतींकडे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २० मे | प्रतिनिधी

(Suprime court) भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात राज्य सरकार व प्रशासनाने आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळलेला नाही, असे समोर आला आहे. या दुर्लक्षामुळे न्यायसंस्थेच्या सर्वोच्चपदावर विराजमान असलेल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आघात झाला आहे, असा सवाल महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला.

(Suprime court) सरन्यायाधीश गवई हे स्वतः आंबेडकरी विचारधारेचे असलेले पहिले न्यायाधीश आहेत. त्यांच्या स्वागतात झालेल्या अनास्थेमुळे सामाजिक स्तरावर संताप व्यक्त होत असून, यामागे जातिवादी मानसिकता कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

(Suprime court) गवईंचा थेट संताप : आपल्या दौऱ्यात सरन्यायाधीशांनी भाषणातून राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती उघडपणे टीकास्त्रांनी वेधली. त्यांनी सांगितले की, इतक्या उच्चपदावर असूनही, प्रोटोकॉलचा अभाव म्हणजे केवळ व्यक्तिविशेषाचा नव्हे, तर संपूर्ण भारतीय संविधानाचा अपमान आहे.

नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे मागणी : या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र लिहून, प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भारतीय न्यायसंस्थेच्या सर्वोच्च प्रतिनिधीचा असा अपमान सहन केला जाऊ शकत नाही,” असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

याप्रकरणी प्रशासनाने अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र, या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *